Maharashtra TAIT Result 2023

 Maha TAIT Result 2023 


महाराष्ट्र टेट परीक्षेचा निकाल 24 मार्च रोजी जाहीर होणार आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022/ 2023 चा निकाल दि. 24/03/2023 च्या दरम्यान प्रसिद्ध करण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी सांगितले आहे.


शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 ही परीक्षा 22 फेब्रुवारी ते 3 मार्च यादरम्यान घेण्यात आली. 

याचा निकाल 5 मार्च या दिवशी लावण्याचा मानस होता मात्र अद्याप याचा निकाल लागलेला नाही मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार 24 मार्च 2023 रोजी या परीक्षेचा निकाल लावण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वेबसाईटवर मिळालेल्या नोटिफिकेशन नुसार आता 24 मार्च 2023 रोजी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT2023) चा निकाल लावण्यात येणार आहे.

How to check Maharashtra TAIT Result 2023

निकाल चेक करण्यासाठी या स्टेप्स वापरा.

1. सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या अधिकृत वेबसाईट

 www.mscepune.in

वर जायचं आहे.


2. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 या टॅबवर क्लिक करायचं आहे.


3. ओपन झालेल्या टॅबवर शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - निकाल डाऊनलोड वेबलिंक वर क्लिक करायचं आहे.


4. ओपन झालेल्या पेजवर आपला एप्लिकेशन ID, Password/ Date of Birth टाकायचं आहे.


5. सबमिट केल्यानंतर आपला निकाल दिसेल. हा निकाल पुढील प्रोसेस साठी डाऊनलोड करून किंवा प्रिंट करून जपून ठेवा.


निकाल डाऊनलोड झाल्यानंतर आपली माहिती नक्की चेक करायला विसरू नका. यामध्ये नाव, आडनाव, आईचे नाव, आपले मार्क्स नक्की चेक करा.


See more resources -

1) TET Exam 2021

2) Name of Different Branches