Board Exam News

 Board Exam News- HSC and SSC


1) बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करणारे आता ५ वर्षांसाठी होणार निलंबित.

उमेदवाराने परीक्षेची प्रश्नपत्रिका अवैध मार्गाने  मिळविणे, मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेची प्रश्नपत्रिका घेणे, विकत घेणे किंवा पाठवणे या अपराधाबद्दल सदर विद्यार्थ्याची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील पाच परीक्षांसाठी अशा विद्यार्थ्याचे निलंबन करण्यात येणार आहे. उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने १० वी आणि १२ वी परीक्षांबाबत एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियम कडक करण्यात आले आहेत.

यंदा दहावी-बारावीसाठी अधिकृत उत्तरपत्रिका, पुरवणी, आलेख, नकाशे, बोर्डाच्या लॉग टेबल्सचा अनधिकृत ताबा आणि वापर केल्यास विद्यार्थी पुढील परीक्षेसाठी अपात्र ठरतील.

परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची चोरी, खरेदी, विक्री आणि खरेदी तसेच मोबाइल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर प्रसारित करण्यास मनाई असेल. उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. पुढील पाच परीक्षांसाठी अशा विद्यार्थ्याचे निलंबन करण्यात येईल. इलेक्ट्रानिक उपकरणे वापरणे, मंडळाने मान्यता दिलेले किंवा प्रतिबंधित केलेले साहित्य परीक्षा हॉलमध्ये ठेवणे, चिठ्या जवळ बाळगणे, अन्य विद्यार्थ्याला नक्कल करण्यास मदत करणे . गुन्हा मानला जाईल.

2) प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दहा मिनिटे अगोदर मिळणे बंद

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते. मात्र आतापरीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात येत आहे.

सर्व परीक्षार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या आहे.

परिपत्रक वाचा-

Board Exam News

------------------------------------

See More Resources




-------------------------------------