शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी
शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी
२०२२ प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज खालील नमूद
वेळापत्रकाप्रमाणे सादर करावयाचे आहेत.
संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे
गुरुवार, दिनांक १०-२-२०२२ ते
गुरुवार, दि.
३१-३-२०२२
(रात्री ११.५९ वा)
विलंब शुल्क भरून ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे.
शुक्रवार, दिनांक १-४-२०२२ ते गुरुवार दि. ७-४-२०२२ (रात्री ११.५९ वा.)
टीप : दिनांक १० फेब्रुवारी, २०२२ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत प्रवेश निश्चिती आणि परीक्षा शुल्क भरलेले असतील त्यांना कोणतेही विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
सदरील परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधीत विद्यार्थी/ पालक/ संस्था यांनी कृपया नोंद घ्यावी. संकेतस्थळ :
👇
Social Plugin