Selection Grade for Teachers

निवडश्रेणी संदर्भातील माहिती पात्रता व निकष

महत्त्वाची माहिती:-

संदर्भ - 

शासन निर्णय 2 सप्टेंबर 1989,शासन निर्णय 1 डिसेंबर 1999,शासन निर्णय 29 जून 2002,शासन निर्णय 15 जुलै 2016


राज्यातील शिक्षकांसाठी शिक्षकांना निवडश्रेणीसाठी अर्हता

1) प्राथमिक शिक्षक (वर्ग 1 ते 8 - D. Ed पात्रता धारक):-

(B.A, B. Com, B. Sc) पदवी प्राप्त करणे आवश्यक.

12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वरीष्ठ वेतन श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.

एकाच वेतनश्रेणीत 24 वर्षे सेवा.

2) माध्यमिक शिक्षक (वर्ग 9 10 - B. Ed पात्रता):-

वरीष्ठवेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.

एकाच वेतनश्रेणीत 24 वर्षे सेवा.

पदवीधर शिक्षकांनी पदव्यूत्तर पदवी करणे आवश्यक आहे.

उदा-

अ) B. A (B. Ed) धारकांनी M. A / M. Ed /M. A (Edu)

ब) B. Com (B. Ed) धारकांनी M. Com / M. Ed /M. A (Edu)

क) B. Sc. (B. Ed) धारकांनी M. Sc / M. Ed / M. A (Edu)

टीप-

ज्या शिक्षकांना अध्यापनाच्या विषयांची पदव्यूत्तर पदवी किंवा तत्सम अर्हता बहिस्थ:रित्या संपादन करता येत नाही त्या ठिकाणी M. Ed / M.A शिक्षणशास्त्र (Edu) ही पदवी ग्राह्य धरण्यात येते (शासन निर्णय 15 जुलै 2016)

टीप-

B. Sc (B. Ed) (Bio किंवा Math) यांनी इतर विषयात इतिहास, मराठी, समाजशास्त्र इ. MA केले असेल तर ग्राह्य धरले जात नाही.

3) उच्च माध्यमिक शिक्षक :-

(11,12 वि) उच्च माध्यमिक शिक्षक

(M.A B.Ed / M.Sc B.Ed / M.Com B.Ed)

उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालय/अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना 12 वर्षाचे वरीष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.

एकाच वेतनश्रेणीत 24 वर्षे सेवा,

M.Phil / P.hd / M.Ed /संगणकातील पदव्युतर पदवी MS - ACIT . अर्हता आवश्यक राहील.

4) विशेष शिक्षक:-

अ) शारीरिक शिक्षक:-

SSC, HSC   एक वर्षे शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम  प्रमाणपत्र धारकांना B.P.Ed ही अर्हता तर B.P.Ed धारकांनी M.P.Ed ही अर्हता प्राप्त करावी

ब) हिंदी शिक्षक:-

SSC,HSC धारकांनी संबधित विषयातील पदवी अथवा समकक्ष  व पदवी धारकांनी  संबंधित पदव्युत्तर वा समकक्ष अर्हता धारण करावी

क) संगीत शिक्षक:-

मॅट्रिक/SSC असलेल्या संगीत विशारद शिक्षकांनी संबंधित विषयातील पदवी तर पदवीधर शिक्षकांनी संबंधित विषयातील पदव्युत्तर अर्हता धारण करावी

ड) चित्रकला शिक्षक:-

DTC किंवा DMC किंवा ATD अशी अर्हता धारण करणाऱ्यानी आर्ट मास्टर (AM) प्रमाणपत्र तसेच G.D.आर्ट किंवा BFA पदवी (रेखा/रंगकला/उपयोजित कला/ शिल्पकला व प्रतिमान) अर्हता धारकांनी कला क्षेत्रातील आर्ट मास्टर प्रमाणपत्र पदवी (AM) किंवा कला शिक्षणशास्त्र पदविका (D. Ed) अशी अर्हता धारण करावी.

अध्यापक विद्यालय-

अध्यापक विद्यालय त शिक्षकांची नेमणूक M.A/M.Sc, M.Ed ही आहे त्यामुळे वेगळी degree घेण्याची आवश्यकता नाही.

 

वरिष्ठ वेतनश्रेणी ही कालबध्द वेतनश्रेणी आहे.

टीप –

D.Ed पात्रता धारक जे शिक्षक माध्यमिक शाळेत 5 ते 7 वर प्रथम नियुक्ती झालेली आहे त्यात 12 वर्षानंतर वरीष्ठवेतन श्रेणी मिळाली आहे त्यानंतर पदवीधर शिक्षक (25%) म्हणून नियुक्ती झाली असेल व 12 वर्षे झाले असेल तर निवडश्रेणीस पात्र नाही कारण वेतनश्रेणीत बदल झाला त्यामळे त्याना पदवीधर शिक्षकाची वरीष्ठ वेतन श्रेणी मिळेल.

एक बाब लक्षात ठेवा एकाच वेतनश्रेणीमध्ये 12 वर्षे झाले तरच वरीष्ठवेतनश्रेणी व 24 वर्षे सेवा झाली असेल तरच निवडश्रेणी निवडश्रेणी संवर्गातील वरीष्ठवेतन श्रेणी मधील सेवाजेष्ठता नुसार 20 % पदांना मिळते सरसकट मिळत नाही तर माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांना द्विस्तरीय वेतनश्रेणी आहे त्यांना निवडश्रेणी देय नाही.


(संकलित माहिती - अधिक जाणून घेण्यासाठी शासन जी.आर. पहावेत)