Std. XII Result

Std. XII Result


Result updates


Std. XII Results will be declared on 25 May at 2 p.m.

Result will be declared online.


Where can you see Std. XII results?


कुठे पाहता येईल निकाल?


बारावीचे विद्यार्थी खालील लिंक वरून निकाल पाहू शकतात.-


https://www.mahahsscboard.in


mahresult.nic.in


hscresult.mkcl.org


mahresults.org.in 


http://mh12.abpmajha.com


https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board


यासाठी विद्यार्थ्यांना बारावीचा पर्याय निवडावा लागेल. 

त्यानंतर हॉल तिकीट क्रमांक आणि इतर डिटेल्स भरल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल कळेल. 

विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड देखील करु शकतात.


------------------------------------------------



See more resources-


1) Career Guidance Videos  

2) Career in Engineering  

3) List of competitive exams 

4) Career Guidance Magazines


Std. XII Result

------------------------------------------------

Std. XII Result  

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर गुरुवार दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.


------------------------------------------------


निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-

(१) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.


Verification of Marks

👇

Link for Verification of Marks

(उत्तर पत्रिका गुण पडताळणी)


---------------------------------------------

👇

Link for Photocopy of Answer sheet

(उत्तर पत्रिका छायाप्रत)


---------------------------------------------

👇

Link for Revaluation of Answer sheet

(उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन)


---------------------------------------------


गुणपडताळणीसाठी शुक्रवार, दिनांक २६/०५/२०२३ ते सोमवार, दिनांक ०५/०६/२०२३ पर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार, दिनांक २६/०५/२०२३ ते बुधवार, दिनांक १४/०६/२०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल.

त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card/ UPI Net Banking) याद्वारे भरता येईल..

२) फेब्रुवारी-मार्च २०२३ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील.

ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

३) फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्र्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

४) जुलै - ऑगस्ट २०२३ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यासाठी सोमवार दि. २९/०५/२०२३ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

५ ) फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ१२ वी ) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्याथ्र्यांना गुणपत्रिका व स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत सोमवार दि.०५/०६/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता वितरित करण्यात येतील..


Official Main Website-

https://verification.mh-hsc.ac.in/

------------------------------------------------


अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सूचना-

उपरोक्त विषयाबाबत एच.एस.सी.बोर्ड मार्फत कळविण्यात आले आहे की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) परीक्षा फेब्रु मार्च २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर झालेला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येणार आहे. 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या ITI ( औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे) Transfer of Credit घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. 

सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने इयत्ता कॉलेज मार्फत भरायचे आहेत.

कालावधी - सोमवार, दिनांक २९/०५/२०२३ते शुक्रवार, दिनांक ०९/०६/२०२३

सदर परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच भरावी. 

सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.

१. ऑनलाईन आवेदनपत्र भरतांना फेब्रु मार्च २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल.

२. श्रेणीसुधार करु इच्छिणान्या फेब्रु मार्च २०२३ मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०२३ व फेब्रुवारी-मार्च २०२४ अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी.

३. सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. 

४. आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.


------------------------------------------------

गुण पडताळणी, उत्तर पत्रिका झेरॉक्स फी


1. उत्तरपत्रिका गुणपडताळणी

दि. २६/५/२०२३ दि.०५/०६/२०२३

रु.५०/-


2. उत्तरपत्रिका छायाप्रत / झेरॉक्स

दि. २६/५/२०२३ दि. १४/०६/२०२३

रु.४००/-


3. उत्तरपत्रिका पुर्नमुल्यांकन 

रु. ३१०/-

मिळाल्यापासून ५ दिवसाच्या आत अर्ज करणे.

-------------------