पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती
महाराष्ट्र शासन शिक्षण-विभागाच्या वतीने आज दिनांक ०२/०९/२०२१ रोजी 'पवित्र पोर्टलच्या' माध्यमातून ५६१ खाजगी
व्यवस्थापनाच्या २०६२ रिक्त पदांसाठी पसंतीक्रमानुसार एका जागेकरीता 1:10 या प्रमाणात 'मुलाखत व अध्यापन
कौशल्यासाठी' शिफारस
करण्यात आली आहे.
खाजगी व्यवस्थापनातील मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या इ. ६ वी ते इ. १२
वी या गटातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर मुलाखतीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची
यादी आज दि.२/९/२०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
👉 उमेदवारांसाठी महत्वाच्या
सूचना:
दिनांक २ /०९/२०२१
१ ) पवित्र पोर्टल मार्फत यापूर्वी मुलाखतीशिवाय पदभरतीसाठीची
कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे. आता मुलाखतीसह पद भरतीची कार्यवाही करण्यात
येणार आहे.
२) मुलाखतीसह पदभरतीमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी या गटातील
जाहिरातीतील एकूण ३८१ पदे रिक्त आहेत. इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी या गटातील
पदांबाबत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
त्यामुळे इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी या गटातील ३८१ रिक्त पदांसाठी मा. उच्च
न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
3) मुलाखतीसह पद भरतीमध्ये
इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ वी गटातील रिक्त पदांसाठी कार्यवाही करण्यात येत आहे.
4) शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचे पत्र
दि ८/७/२०२१ नुसार SEBC प्रवर्गातील
जागा EWS/GENERAL यापैकी
योग्य त्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत.
5) मुलाखतीसह पद भरतीच्या
जाहिरातीमध्ये SEBC या
प्रवर्गासाठी जागा असणाऱ्या व्यवस्थापनापैकी ज्या व्यवस्थापनाच्या जाहिरातीमध्ये
खुला (समांतर आरक्षणाशिवाय) प्रवर्गासाठी जागा उपलब्ध होत्या, त्या ८२ व्यवस्थापनांसाठी
सर्वच उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिलेले आहेत. या ८२ व्यवस्थापनांतील SEBC प्रवर्गाचे पदे EWS/GENERAL या प्रवर्गामध्ये वर्ग होत
असतील तरी उमेदवारांचे प्राधान्यक्रम पुर्वीच खुल्या प्रवर्गासाठी जाहिरात
असल्याने पोर्टलवर उपलब्ध आहेत.
6) या ८२ व्यवस्थापनांचे
स्वतंत्र प्राधान्यक्रम न घेता या ८२ व्यवस्थापनासह अन्य नव्याने प्राधान्यक्रम
घेण्याची आवश्यकता नसणाऱ्या उर्वरीत व्यवस्थापनांच्या मुलाखतीसह पद भरतीसाठी
कार्यवाही करण्यात येत आहे.
7) अशा रीतीने एकूण ५६१
व्यवस्थापनांच्या २०६२ रिक्त पदासाठी आज दिनांक २/९/२०२१ रोजी मुलाखतीसह पद
भरतीसाठी शिफारस करण्यात येत आहे.
8) या व्यवस्थापनांना मुलाखत व
अध्यापन कौशल्यासाठी एका जागेकरीता १:१० या मर्यादेत (समांतर आरक्षणासह व उमेदवार
उपलब्धतेच्या मर्यादेत) उमेदवार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
9) मुलाखत व अध्यापन कौशल्य
बाबतची कार्यवाही व्यवस्थापनांकडून दिनांक १३/०९/२०२१ ते दिनांक १४/१०/२०२१ या
कालावधीत करण्यात येईल.
10) उमेदवाराने लॉगीन
केल्यानंतर गुणवतेनुसार उमेदवार ज्या जास्तीत जास्त १० प्राधान्यक्रमावर मुलाखत व
अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरले असेल त्या व्यवस्थापनांची यादी Reports- Interview Recommendation Status -
View Recommended Institutes List या बटन वर क्लिक केल्यानंतर दिसेल व संस्थेच्या
नावासमोरील शेवटच्या रकान्यातील VIEW
वर क्लिक केल्यानंतर सबंधित व्यवस्थापनासाठी संपर्काचा तपशील दिसेल.
त्यानुसार आपण पात्र ठरलेल्या संस्थेकडे पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधावा.
11) ज्या उमेदवाराची गुणवतेनुसार
मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झाली नाही, त्यांना Reports- Interview Recommendation Status - View Preference wise
Status या बटन वर क्लिक केल्यानंतर शिफारस न होण्याचे कारण दिसेल.
12) उमेदवारांच्या मुलाखत व
अध्यापन कौशल्यासाठी एकूण ३० गुण असतील, उमेदवारांची अंतीम निवड या ३० गुणाच्या आधारे व्यवस्थापनाकडून होईल.
13) मुलाखतीसह पद भरतीकरीता
अधिकच्या माहितीसाठी पोर्टल वर अपलोड केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे वाचन करावे.
14) मुलाखतीसह पदभरतीमध्ये SEBC प्रवर्गासाठी जागा असणाऱ्या
व्यवस्थापनांपैकी ज्या व्यवस्थापनांकडे जाहिरातीमध्ये खुला(समांतर आरक्षणाशिवाय)
प्रवर्गासाठी जागा नाहीत अशा १९६ व्यवस्थापनांसाठी सर्वच उमेदवाराकडून नव्याने
स्वतंत्रपणे प्राधान्यक्रम घेण्यात येतील. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत
प्राधान्यक्रम GENERATE करून LOCK करणे आवश्यक राहील.
15) या १९६ व्यवस्थापनांच्या
७६९ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात येतील. या पूर्वी
ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम LOCK
केलेले आहेत त्यांना देखील प्राधान्यक्रम बदल /अपडेट करण्याची सुविधा
दिली जाईल. जे उमेदवार प्राधान्यक्रम बदल करून LOCK करतील त्यांचे बदल केलेले प्राधान्यक्रम विचारात
घेतले जातील. जे उमेदवार प्राधान्यक्रमामध्ये बदल करणार नाहीत त्यांचे पूर्वीचेच LOCK केलेले प्राधान्यक्रम
विचारात घेतले जातील.
16) SEBC प्रवर्गातील जागा EWS/GENERAL या प्रवर्गामध्ये वर्ग होत
आहेत. त्यामुळे १९६ व्यवस्थापनासाठी सर्वच उमेदवारांकडून नव्याने स्वतंत्रपणे
प्राधान्यक्रम घेण्यात येणार आहेत. परंतु अनेक उमेदवारांकडून गैरसमजुतीने वा
चुकीने स्व प्रमाणपत्रात चुकीची माहिती भरलेली असल्यामुळे माहितीमध्ये बदल
करण्याची मागील २ वर्षापासून विनंती होत आहे. या परिस्थितीत बदलाची मागणी विचारात
घेता अशा उमेदवारांना तसा योग्य बदल करण्याची सुविधा देण्यात येईल. याबाबतचा
कालावधी पोर्टलवर कळविण्यात येईल.
17) उमेदवारांनी प्राधान्यक्रम LOCK केल्यानंतर लगेचच या १९६
व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एका जागेकरीता जास्तीत जास्त १:१० या
मर्यादेत (समांतर आरक्षणासह व उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत) उमेदवार उपलब्ध करून
दिले जाणार आहेत.
18) गुणवतेनुसार जास्तीत जास्त
१० प्राधान्यक्रमावर मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवाराची पोर्टल मार्फत त्या
त्या व्यवस्थापनांकडे शिफारस होणार आहे.
19) नियुक्ती प्राधिकारी म्हणून
ज्या व्यवस्थापनांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात दिलेली होती, परंतु या व्यवस्थापनांनी
पोर्टल मार्फत पदभरती न करण्याबाबत विविध प्रशासकीय कारणे पदभरतीच्या प्रक्रियेपूर्वी
आगाऊ कळविले असल्याने अशा १४ व्यवस्थापनांच्या ४२ पदांसाठी उमेदवारांची
मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आलेली नाही. अशा १४ व्यवस्थापनांच्या ४२ पदांसाठीची
यादी माहितीसाठी पोर्टल वर देण्यात येत आहे.
20) निवड प्रक्रियेबाबत काही
अडचणी असल्यास संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांशी संपर्क साधावा.
21) उमेदवारांना पवित्र पोर्टल
च्या edupavitra@gmail.com वर
संपर्क साधता येईल.
संकलक - जयवंत पाटील
अधिक माहितीसाठी खालील फ्लिप बुक पहा किंवा प्रिंट करा:
Pavitra Portal Website:
http://www.edustaff.maharashtra.gov.in
Registration Process
1) Go to the official of the School Education and Sports
Department, Government of Maharashtra that is edustaff.maharashtra.gov.in
2) Select the “Application” section visible at the left side of
the page.
3) Thereafter, go to the “Pavitra” section and hit on the
“Applicant” link.
4) Now hit on the “Registration link” already registered
candidates have to press login details.
5) Enter your Tait Exam Number as Login ID and create your
password using a mobile OTP option.
6) Now fill the application form by providing the complete
information.
7) Fill Educational Qualification Details like State
Board/University Passing month Marks Main Subjects, Secondary, Higher
secondary, Degree etc.
8) Fill the details of the professional Qualification and Upload
the required documents.
9) Finally, submit the form and note down your registration
number.
Social Plugin