STD. XII Result 2020-21- Guidelines


 

बारावी निकाल संदर्भात काही सूचना

महत्वाचे- सात सदस्य असलेली परीक्षा समिती नेमावी यात प्राचार्य/ उपप्राचार्य प्रमुख असतील. त्यांच्या कडे सर्व निकालाची जबाबदारी असेल.

प्रमुख नियोजन-

🔹 विद्यार्थ्यांची एस.एस.सी.  गुणपत्रके जमा करून घेणे.


🔹 इयत्ता अकरावी चा अंतिम निकाल पुन्हा तपासून बरोबर आहे का खात्री करणे.


🔹 विद्यार्थ्याचे स्टुडंट पोर्टल मधील प्रमोशन करताना भरलेले मार्क ( *टक्केवारी*) 11 वी च्या निकाल पत्रका प्रमाणेच आहेत का ते पाहणे. 


🔹 प्रत्येक विषयाची कच्ची विषय स्लीप तयार करणे.


🔹 बोर्डाने दिलेल्या क्रमांकानुसार सर्व तुकड्यांची मिळून एकच विषय स्लीप प्रत्येक विषयासाठी असावी.


🔹 कच्च्या विषय स्लीपवरील दहावी व अकरावीचे गुण तपासणे. 


🔹 पक्की विषय स्लीप तयार करणे. बोर्ड परिशिष्ट प्रमाणे. (Excell मध्ये )


🔹 पक्की विषय स्लिप क्रॉस चेक करणे.


🔹 परिशिष्ट प्रमाणे संकलित निकाल (R1 sheet) तयार करणे.


🔹 विषय स्लीप प्रमाणे संकलित निकाल पत्रक क्रॉस चेक करणे. 


🔹 संकलित निकाल पत्रकावरचे मार्क बोर्ड सॉफ्टवेअर मध्ये भरणे. 


🔹 भरलेल्या मार्कावरून ऑनलाईन रिपोर्ट काढणे. 


🔹 ऑनलाईन रिपोर्ट  मूळ संकलित निकाल पत्रकाप्रमाणे तपासणे.  


🔹 ऑनलाईन रिपोर्ट मध्ये काही दुरुस्त्या असल्यास बोर्ड सॉफ्टवेअर मध्ये एडिट ऑप्शन चा वापर करून दुरुस्ती करून घेणे.


🔹 बोर्ड सॉफ्टवेअर मध्ये स्टूडेंट डाटा कन्फर्म करणे.


🔹 स्टुडन्ट डाटा कन्फर्म झाल्यानंतर पुन्हा ऑनलाईन रिपोर्ट काढणे. 


🔹 सर्व परिशिष्टे, संकलित निकाल पत्रक, ऑनलाईन रिपोर्ट किमान दोन प्रतीत तयार करणे. 


🔹 सर्व परिशिष्ट, विषय स्लीप यावर विषय शिक्षकांच्या सह्या (एकाच विषयासाठी अधिक शिक्षक असतील तर सर्वांच्या सह्या)  असणे आवश्यक.


🔹 संकलित निकाल पत्रकावर वर्ग शिक्षकांची (शिक्षकांच्या) सह्या आवश्यक.


🔹 या सर्व हार्ड कॉपी वर परीक्षा समितीच्या सर्व सदस्यांच्या सह्या असणे आवश्यक.


🔹 सर्व कागदपत्रे दोन प्रतीत तयार करून एक बोर्डास व एक कॉलेजमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवणे.


संकलीत माहिती- यात आवश्यक ते नुसार बदल होऊ शकतात.