Search for committee members by Balbharti

Search for committee members by Balbharti 

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ‘बालभारती’, पुणे मार्फत

आवाहन करण्यात आले आहे की भाषा समिती साठी नावे द्यावीत.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळामार्फत पाठ्यपुस्तकांच्या व पूरक साहित्याच्या लेखन संपादन इत्यादी कामांसाठी शैक्षणिकस्तर व माध्यमनिहाय विविध विषयांच्या व भाषांच्या समित्या गठित करण्यासाठी लिंक दिनांक ०४-०७-२०२२ ते २०- ०७-२०२२ दरम्यान उपलब्ध करून देण्यात आली होती. या लिंकला उत्तम प्रतिसाद विविध स्तरातून मिळाला आहे. तथापि काही विषयांना अपेक्षेप्रमाणे कमी अर्ज आले आहेत.

लिंकद्वारे भरलेल्या अर्जांशिवाय अनेक विनंती अर्ज अजूनही मंडळाकडे ऑफलाईन पद्धतीने येत आहेत. या सर्व बाबींचा सारासार विचार करून समाजातील शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व स्तरासाठी मंडळामार्फत अजून एक संधी देण्याच्या हेतूने खालील लिंक पुनश्चः प्रकाशित करण्यात येत आहे.

या लिंकचा दुवा balbharati.in या मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनुभवी तज्ज्ञ, इच्छुक व्यक्तींकडून माहिती मागवण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

ज्यांनी यापूर्वी अर्ज केला आहे त्यांनी पुन्हा या लिंकवर अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.  

लिंक:-


👇

New Committee for 2023 

 

आपला मोबाईल नंबर टाका. ओटीपी आल्यावर तो टाका. त्यानंतर आपली माहिती भरावी.

सदर लिंक दिनांक २७-०४-२०२३ च्या सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरु होऊन दिनांक ०२-०५-२०२३ रात्री १२.०० वाजेपर्यंत खुली राहील.

 

------------------------------------------------ 

Search for committee members by Balbharti


-----------------------------------------------------



राज्य अभ्यासक्रम आराखडे विकसित करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींच्या निवडीसाठी पुन्हा एक संधी देण्यात आली होती. ही लिंक बंद झाली आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्रपुणे मार्फत राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मितीची प्रक्रिया सर्वसमावेशक व राज्यातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या समवेत तयार करण्यात येणार आहे. त्याकरिता ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेल्या तज्ज्ञ निवड प्रक्रियेसाठी या कार्यालयास खालील ४ राज्य अभ्यासक्रम आराखडे विकसनासाठी लिंकद्वारे एकूण ४५१२ अर्ज प्राप्त झालेले आहेत. ज्यांनी यापूर्वीच्या लिंकवर ऑनलाईन अर्ज सादर केला आहे त्यांच्या अर्जाचा विचार केला जाणार असल्याने सदर व्यक्तींनी पुन्हा लिंक भरण्याची आवश्यकता नाही.

१. राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण

२. राज्य अभ्यासक्रम आराखडा- बालपणातील काळजी व शिक्षण

३. राज्य अभ्यासक्रम आराखडा- शिक्षक शिक्षण

४. राज्य अभ्यासक्रम आराखडा - प्रौढ शिक्षण

उपरोक्त नमूद प्रमाणे चार राज्य अभ्यासक्रम आराखडे विकसित करण्यासठी तसेच विषय समित्या आणि अभ्यासमंडळे गठीत करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील प्राचार्यवरिष्ठ अधिव्याख्याताअधिव्याख्याताअध्यापक विद्यालयातील प्राचार्य व अध्यापकाचार्य, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, विषय तज्ज्ञ, विशेष तज्ज्ञ, केंद्रप्रमुख, प्राथमिक / माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक तसेच विद्यापीठातील प्राध्यापकवरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शासनाच्या विविध विभागातील अधिकारी, अशासकीय संस्थांचे सदस्य या मधील इच्छुक तज्ज्ञांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसन कार्यात योगदान देण्यासाठी राज्यातील उपरोक्त तज्ज्ञ व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

लिंक 27 मार्च ला सुरु होईल.


👇Link is now closed


राज्य अभ्यासक्रम आराखडे विकसित करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींच्या निवडीसाठी पुन्हा एक संधी देण्यात आली होती. ही लिंक बंद झाली आहे.

या लिंकवर क्लिक करून संबंधितांनी आपले नामांकन दाखल करावे.

विषयनिहाय तज्ज्ञत्व लक्षात घेऊन संबंधित विषयांमध्ये तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींमधूनच निवड करण्यात येणार आहे. तथापि, काही व्यक्ती संबंधित विषयाची उच्चतम अर्हता नसताना सुद्धा अनुभवाने पारंगतता आत्मसात केलेल्या असतात. अशा व्यक्तींचा अनुभव, प्रत्यक्षात केलेले काम, स्वयंप्रेरणा आणि ऊर्जा लक्षात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखडा (SCF) / अभ्यास मंडळ / विषयनिहाय तज्ज्ञ समिती यांचाही निवड प्रक्रियेत विचार केला जाणार आहे.

 सद्यस्थितीत पायाभूत स्तराचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा प्राप्त झालेला असून प्राधान्याने पायाभूत स्तर राज्य अभ्यासक्रम आराखड्यासाठी निवड प्रक्रिया होणार आहे. टप्प्याटप्प्याने उपरोक्त नमूद उर्वरित तीन प्रकारचे राज्य अभ्यासक्रम आराखडे (SCF) आणि अभ्यासमंडळे व विषय समित्यांसाठी प्रस्तुत लिंक मध्ये भरलेल्या माहितीद्वारे तज्ज्ञ व्यक्तींची निवड केली जाणार आहे.

तरी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडाअभ्यासक्रमपाठ्यक्रमअध्ययन- अध्यापन साहित्य तयार करण्याच्या प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेऊन योगदान देण्याची इच्छा व आवश्यक तज्ज्ञत्व असणाऱ्यांनी


 👇Link is now closed


या वेबसाईटवर आवेदन करावे. सदर आवेदन पत्र भरण्यासाठी दि. २७ मार्च२०२३ ते ३१ मार्च, २०२३ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे.

 

---------------------------------------------------------

 

 

Dates for filling form: 27 March 2023 to 31 March 2023

Up to 12 a.m.

 

Fill in the information by clicking on the link below.

 👇Link is now closed

----------------------------------------

See the official letter:-


 ---------------------------------------------------------





Old News-

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम  संशोधन मंडळ, पुणे यांचे वतीने *पाठ्यपुस्तकांच्या व पुरक साहित्याच्या लेखन संपादन, चित्राकृती   इ. कामासाठी विविध विषयांच्या व भाषांच्या समित्या गठित करणेसाठी अनुभवी, तज्ञ व इच्छुक व्यक्तींकडून/ शिक्षकांकडून माहिती मागविण्यात येत आहे.*  

खालील लिंकवर क्लिक करून माहिती भरावी.

On behalf of Maharashtra State Textbook Production and Curriculum Research Board, Pune, information is being sought from experienced, expert and interested persons / teachers to form committees on various subjects and languages ​​for the work editing of textbooks and supplementary literature, illustrations etc.


Dates for filling form: 4 July 2022 to 20 July 2022


Fill in the information by clicking on the link below.

 👇Link is now closed

New Committee for 2022


Click on the above link. You can see the following page


Enter your mobile number. You will get OTP in your message box. Insert it. You will see the form to fill.




Fill the form and save it.


-----------------------------------
Download the Certificate A and B by clicking the following links. Take their printouts. Take stamps and signature of concern authorities.



--------------------------------


See original Advertisement
👇


See More Resources: