YCMOU Exams- August
2021
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक च्या विविध शिक्षणक्रमांच्या
ऑगस्ट 2021 मधील
ऑनलाईन (मे 2021 उन्हाळी
परीक्षा)
परीक्षेसंबंधीच्या सूचना:
विद्यापीठाने ऑगस्ट 2021
मध्ये विविध शिक्षणक्रमाच्या ऑनलाईन परीक्षा आयोजित केलेल्या असून त्यांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर
प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थ्याने आपल्या पेपरचा दिनांक व वेळ वेळापत्रकानुसार
आधीच पाहून खात्री करावी व मगच परीक्षा द्यावी.
1) ऑनलाईन
लॉगीन स्लॉट टाईम
1. M = Morning = सकाळी 8.00AM
To 1.00PM
2. A = Afternoon दुपार 3.00PM
To 8.00PM
3. किंवा
वेळापत्रकामधे दर्शविल्याप्रमाणे 8.00AM To 8.00PM.
परीक्षा पद्धती बहुपर्यायी प्रश्न प्रत्यक्ष
परीक्षा 60 मिनिटे वेळापत्रकातील प्रोग्रॅम
कोडनुसार आपला पेपर किती तारखेला किती वाजता, कुठल्या
लॉगीन स्लॉट मध्ये आहे ते पाहून विद्यार्थ्याने पुरेशा वेळ आधी परीक्षेला सुरुवात
करावी. लॉगीन स्लॉट टाईम 5 तासांचा असला तरी प्रत्यक्ष परीक्षेचा
वेळ 60 मिनिटे (एक तास) आहे. त्या कालावधीत
परीक्षा संपवणे आवश्यक राहील. विद्यार्थ्याने परीक्षेला उपलब्ध 50 प्रश्नांपैकी 30 प्रश्न 60 मिनिटांत सोडवायचे आहेत. प्रत्येक
प्रश्नाला 2 गुण याप्रमाणे 60 गुणांची परीक्षा होईल आणि 60 गुणांचे रुपांतर 80 गुणात करण्यात येईल.
2) वेळापत्रकानुसार
परीक्षा दोन सेशनमध्ये सकाळी (M) 8 ते 1 व दुपारी (A) 3 ते 8 या वेळेत किंवा वेळापत्रकामधे दर्शविल्याप्रमाणे सकाळी
8 ते
रात्री 8 या
वेळेत होईल.
3) कुठल्याही कारणास्तव ऑनलाईन परीक्षा (बंद)
टर्मिनेट झाल्यास (उदा- इंटरनेट कनेक्टीव्हिटी, पॉवर सप्लाय, अन्य कारणे) विद्यार्थ्याला दिलेल्या लॉग ईन
स्लॉट टाईम मध्ये पुन्हा एकदा लॉग ईन होऊन परीक्षा पूर्ण करता येईल आणि त्याला
त्याच्या शिल्लक वेळच पुन्हा उपलब्ध होईल.
उदा. एखादा विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा सुरु केल्यानंतर 10 मिनिटांतच कुठल्याही कारणाने ऑनलाईन
प्रणालीतून बाहेर पडला आणि परीक्षा थांबली तर तो विद्यार्थी दिलेल्या लॉग ईन स्लॉट
टाईम मध्ये पुन्हा लॉग ईन होऊ शकेल, त्याला त्याचा उरलेला वेळ 50 मिनिटे मिळेल, त्याने पूर्वी सोडविलेल्या
प्रश्नांशिवाय शिल्लक प्रश्न सोडवण्यास उपलब्ध होतील.
4) विद्यार्थ्यांने शक्यतो लॉग ईन स्लॉटच्या
सुरुवातीस लवकर परीक्षा देण्यास सुरुवात करावी, जेणे करून जर काही तांत्रिक अडचण निर्माण झाली, तर ती अडचण सोडविण्यास पुरेसा वेळ त्या
लॉग ईन स्लॉट टाईम मध्ये उपलब्ध असेल आणि विद्यार्थ्याला दिलेल्या लॉग ईन स्लॉट
टाईममध्ये परीक्षा पूर्ण करता येईल.
5) विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी http://ycmou.unionline.in
ही लिंक Browser मधे ओपन करून परीक्षा प्रणालीत प्रवेश करायचा आहे.
6) ऑनलाईन परीक्षा सुरु करणेपूर्वी विद्यार्थ्यास
परीक्षेसाठी नोंदणी करावी लागेल. नोंदणी करताना त्यास प्रथम कायम नोंदणी क्रमांक (PRN) टाकावा लागेल. त्यानंतर त्याचे नाव
स्क्रीनवर दिसेल. त्याचे नाव व कायम नोंदणी क्रमांक बरोबर असल्याची खात्री
झाल्यानंतर विद्यार्थ्याने स्वतःची जन्मतारीख Password समोर DDMMYY या पध्दतीने भरावी / ऐंटर करावी. (प्रवेश अर्ज
भरतांना नोंदणी केलेल झाल्यानंतर परीक्षेचा 60 मिनिटांचा कालावधी सुरु होईल. आपण परीक्षेला
लॅपटॉप अथवा डेस्कटॉप वापरणार असाल तर Login आणि USER Password वापरून लॉगीन करावे.
7) ऑनलाईन परिक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याने Login करण्यासाठी आपला (कायम नोंदणी क्रमांक- PRN) PRN समोर भरावा. Date of Birth समोर आपली जन्म तारीख (प्रवेश अर्ज भरतांना नोंदणी केलेली )DDMMYY ह्या स्वरूपात भरावी. PRN व Date of Birth इंग्रजी मधे टाकण्यात यावी. त्यानंतर Select Active Test मधून आपल्या विषयाची प्रश्नपत्रिका Select करून Login करावे. 8) Video User Manual चा वापर करावा.
9) Smart Phone hell Google Chrome
fal Mozilla Firefox Browser amada Browser ची history. cookies आणि caches वेळोवेळी Clear कराव्यात.
10) विद्यापीठाने याच लिंकवर दि.01/08/2021 पासून विद्यार्थ्याकरीता डेमो परीक्षा
(Mock Test) टप्प्या
टण्याने उपलब्ध करून दिली आहे. तरी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी ती
सोडवून सराव करावा म्हणजे प्रत्यक्ष परीक्षा देताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत.
डेमो परीक्षेबाबतचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. तसेच B.A. /
B.Com शिक्षणक्रमांच्या
विद्यार्थ्यासाठी दि.02/08/2021 पासून Mock Test उपलब्ध करून दिली जाईल.
11) परीक्षेच्या कालावधीत परीक्षेसंदर्भात येणाऱ्या
अडचणी सोडविण्यासाठी विभागीय केंद्रावर प्रती सत्र एका व्यक्तीची नियुक्ती केलेली
आहे त्याचा मोबाईल नंबर विद्यापीठाच्या पोर्टलवर जिल्हानिहाय देण्यात आला आहे.
परीक्षेसंदर्भात अडचणीबाबत आपल्या जिल्ह्यातील संबंधित व्यक्तीशी संपर्क करावा
अथवा विभागीय
केंद्रातील संबंधितांशी करावा. विभागीय केंद्रातील प्रत्येक संबंधित व्यक्तींचे
नाव व फोन नं. पोर्टलवर दिले आहे. त्याचा वापर करून शंकानिरसन करून घ्यावे.
12) विद्यार्थ्यांना
त्याची कुठल्या विषयाची परीक्षा होणार आहे यासाठी या Event ना ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे
त्यांची यादी विद्यापीठाच्या पोर्टलला दिनांक 02/08/2021 रोजी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानुसारच्या विषयांची परीक्षा
विद्यार्थ्याने द्यावी.
13) ऑनलाईन
परीक्षेचा पेपर पूर्ण सोडवून झाल्यानंतरच Submit या पर्यायावर क्लिक करावे. Submit पर्यायावर चुकूनही आधी क्लिक केले गेले तरी परीक्षा संपुष्टात येईल व
पून्हा लॉगीन केल्यानंतरही सदर पेपर उपलब्ध होणार नाही. याची विद्यार्थ्याने नोंद
घ्यावी.
14) पेपर
सोडविताना Clear या पर्यायाने चालू प्रश्नाचे उत्तर Clear होते. Clear या पर्यायाने आधी सोडविलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे Clear होत नाहीत.
15) वस्तुनिष्ठ
स्वरुपाच्या / बहुपर्यायी (Multiple Choice Question-MCQ) परीक्षांसाठी फोटोकॉपी
पूनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध होणार नाही.
(16) ऑगस्ट 2021 ऑनलाईन परीक्षा व सराव परीक्षा लिंक:-
अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या
संकेतस्थळाचा वापर करावा.
Exam Time Table
परीक्षेचे वेळापत्रक
👇
YCMOU Exam August 2021(Download)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (Yashwantrao Chavan
Maharashtra Open University) बी. ए. (BA)
आणि बी. कॉम.च्या (BCom) पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. विद्यार्थी संख्या अधिक असल्याने तांत्रिक अडचणी येऊ नयेत म्हणून परीक्षा दोन भागात होतील.
ऑगस्टमधील परीक्षा आता सप्टेंबरमध्ये होतील
बी. ए. आणि बी. कॉमच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षा ११ ऑगस्टपासून सुरु होणार होत्या. त्याऐवजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर या विभागीय केंद्रात ३ सप्टेंबरला, तर नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड या विभागीय केंद्रात ४ सप्टेंबरपासून परीक्षा सुरु होतील.
द्वितीय वर्षाच्या परीक्षा वेळापत्रकात काही बदल असून, ते विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
तुकडी क्रमांक एक : अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातील सर्व अभ्यासकेंद्र व परीक्षा केंद्र
तुकडी क्रमांक दोन : नाशिक, नगर, धुळे, जळगांव, नंदूरबार, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील सर्व अभ्यासकेंद्र व परीक्षा केंद्र
Social Plugin