Std. XII Result Data and Process- 2021

 Std. XII Result Data and Process- 2021

Time table:

तपशील

कालावधी

1) मुख्याध्यापक/प्राचार्य व शिक्षक यांचेसाठी मूल्यमापन कार्यपध्दतीबाबत मंडळाच्या यु- ट्युब चॅनेलवरुन प्रशिक्षण

 

दि. ०७/०७/२०२१

(स. ११.०० ते दु. ०१.००)

 

2) अपवादात्मक परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे

 

दि.०७/०७/२०२१ 

ते 

दि. १४/०७/२०२१

 

 

3) विषय शिक्षकांनी विषयनिहाय गुणतक्ते वर्ग शिक्षकांकडे सादर करणे.

 

दि.०७/०७/२०२१ 

ते 

दि. १४/०७/२०२१

 

4) वर्ग शिक्षकांनी संकलित निकाल अंतिम करुन तो उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाच्या निकाल समितीकडे सादर करणे.

 

दि.०७/०७/२०२१ 

ते 

दि. १४/०७/२०२१

 

5) वर्ग शिक्षकांनी तयार केलेल्या निकालाचे निकाल समितीने परीक्षण व नियमन करून प्रमाणित करणे.

 

दि. ०८/०७/२०२१ 

ते

दि. १७/०७/२०२१

 

6) मुख्याध्यापक / प्राचार्यानी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरणे.

दि. १६/०७/२०२१ 

ते

दि. २३/०७/२०२१

 

7) मुख्याध्यापक/प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे निकाल व अनुषंगिक स्वाक्षरी प्रपत्रे सिलबंद पाकीटात विभागीय मंडळात जमा करणे. (विभागीय) | मंडळाच्या नियोजनानुसार)

 


दि. २४/०७/२०२१

 

8) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षा निकालाबाबत विभागीय मंडळ व राज्यमंडळ स्तरावरील प्रक्रिया

 


दि.२४/०७/२०२१ पासून

 


Important Points:

1) नियमित, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे परिक्षार्थी यांचेबाबतीत लागू असल्याप्रमाणे समितीने प्रमाणित केलेल्या इ.१२ वीच्या संकलित निकालाची एक मूळ प्रत व फक्त अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या इ. १० वीच्या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत व इ.११ वीच्या संकलित निकालाची साक्षांकित प्रत (इ. ११ वी अन्य मंडळातून/अन्य कनिष्ठ महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत इ.११ वीच्या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत) सिलबंद पाकीटात मुख्याध्यापक / प्राचार्यांच्या अभिरक्षेत ठेवून त्याची दुसरी प्रत संबंधित विभागीय मंडळाकडे निर्धारित कालावधीत जमा करावी. उपरोक्त साक्षांकिंत प्रतीवर संबंधित विद्यार्थ्यांचे सन २०२१ च्या इ.१२ वीच्या परीक्षेचे मंडळाचे बैठक क्रमांक नमूद करावेत.


एच.एस.सी.बोर्ड. मंडळात जमा करण्यासाठी:

१) इ.१२ वीच्या संकलित निकालाची एक मूळ प्रत.

२) फक्त अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या इ. १० वीच्या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत. (सन २०२१ च्या इ.१२ वीच्या परीक्षेचे मंडळाचे बैठक क्रमांक)

३) इ. ११ वी अन्य मंडळातून/अन्य कनिष्ठ महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत इ.११ वीच्या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत. (सन २०२१ च्या इ.१२ वीच्या परीक्षेचे मंडळाचे बैठक क्रमांक)


2) नियमित विद्यार्थ्यांच्या बाबतीत मूल्यमापन करताना इ. १० वीच्या सर्वोत्तम तीन विषयांचे सरासरी गुण, इ.११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ. १२ वीचे वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.१२ वीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/ अंतर्गत व तत्सम मूल्यमापन इत्यादींच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयनिहाय प्राप्त झालेले गुण विचारात घेण्यात यावेत. सदर गुणदान करताना शासन निर्णयातील सर्व तरतूदींचे काटेकोर पालन करण्यात यावे.


महत्वाचे:

इयत्ता १० वी, इ. ११ वी व इ. १२ वी मधील प्राप्त गुणांचे इ. १२ वीसाठी भारांशानुसार निर्धारित गुणांमध्ये रूपांतर करतांना अपूर्णांकात आलेले गुण पुढील पूर्ण गुणात रुपांतरीत करावेत.

उदा. 

१३.००=१३

१३.०१=१४

१३.५०=१४

१३.५१=१४


3) राज्य मंडळाच्या मार्च २०१९ पूर्वीच्या परीक्षेत इ.१० वी उत्तीर्ण झालेल्या अथवा अन्य मंडळातून इ.१० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर गुणांचे निश्चितीकरण करण्याची प्रक्रीया सुलभ व्हावी यासाठी मंडळामार्फत परिशिष्ट जे आर १.०१ व जे आर १.०२ मधील नमुन्यातील Excel sheet स्वरूपातील तक्ता उपलब्ध करून दिला जाईल. इयत्ता १२ वीला सन २०२१ च्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या नियमित विद्यार्थ्यांची इ.१० वीच्या सर्व विषयांची संपादणूक त्यामध्ये भरल्यानंतर सदर विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम तीन विषयांच्या गुणांची बेरीज व पूर्णांकातील सरासरी (१०० पैकी) उपलब्ध होईल. सदर सरासरी इ.१० वीच्या ३० टक्के भारांशानुसार गुण निश्चितीसाठी प्रत्येक विषयाकरीता वापरता येईल.


4) अकरावी चे गुण:

A) अकरावी व बारावी चे विषय सारखे असतील तर:

विद्यार्थ्यास इ. ११ वीच्या अंतिम निकालामध्ये प्राप्त झालेले विषयनिहाय गुण इ. १२ वीसाठी त्या त्या विषयाकरीता विचारात घ्यावेत. अन्य मंडळातून इ. ११ वी उत्तीर्ण होवून इ.१२ वीसाठी राज्य मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत संबंधित मंडळाच्या इ.११ वीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुण विचारात घ्यावेत.

 

B) अकरावी व बारावी चे काही किंवा सर्व विषय वेगवेगळे असतील तर:

राज्य मंडळ / अन्य मंडळाच्या विद्यार्थ्याबाबत इ. १२ वी मध्ये प्रविष्ठ झालेल्या विषयांपैकी एक किंवा अधिक विषय इ.११ वी मध्ये घेतले नसल्यास अशा विषयांसाठी इ. ११ वी मध्ये घेतलेल्या अन्य विषयांची सरासरी विचारात घेवून १०० पैकी गुण (पूर्णांकांत) निश्चित करावेत. व ते इ. ११ वीसाठी न घेतलेल्या विषयांस देवून पुढील कार्यवाही करावी. इ.११ वी तून इ. १२ वी मध्ये प्रवेश घेताना शाखा बदल केलेल्या प्रकरणांत देखील याप्रमाणे कार्यवाही करावी.

    

C) १०० पेक्षा अधिक गुण एका किंवा अधिक विषयात असतील तर:

             इ.११ वी मधील एक व अधिक विषय १०० पेक्षा अधिक गुणांचे असल्यास त्या विषयांचे प्रथम १०० पैकी गुणांत रूपांतर करून कार्यवाही करावी.


Excel Charts for evaluation




Charts created by-

Prof Nitin Gunjal 
D. N. Patil Anudanit Asharmashala 
Mukhed Tal-Niphad


Consolidated all  subjects chart



How to fill marks of Repeater Students:

रिपीटर विद्यार्थ्यांचे गुण कसे भरावे:-

रकाना-२: सर्व विषयांची नावे लिहा. 

उदा.इग्रजी. मराठी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, शा शि. पर्यावरण याप्रमाणे.

रकाना ३: ज्या विषयात सूट मिळाली त्या विषया समोर होय लिहा तर  ज्या विषयांना सूट मिळाली नाही त्या विषया समोर नाही लिहा.

रकाना ४: मध्ये पास झालेल्या महिन्याचे नाव लिहा.

उदा.मार्च, जुलै, नोव्हेंबर.

रकाना ५ : मध्ये पास झालेले वर्ष लिहा

रकाना ६: मध्ये ज्या वर्षी जो विषय  सुटला त्यांचा बैठक क्रमांक लिहा.

रकाना ७: मध्ये इ१० मधील जास्तीत जास्त गुण मिळालेल्या विषयांच्या गुणांची बेरीज करून, सरासरी काढा. व ती सूट न मिळाल्या विषया समोर लिहा.उदा इंग्रजी व अर्थशास्त्र विषय राहिला असेल आणि १०वी  तीन विषयांच्या गुणांची सरासरी ६२ आहे.तर ती सुट न मिळाल्या विषया समोर लिहा.

रकाना ८: मध्ये ६२ गुणांच्या ४०%(६२×४०÷१००=२४.५=२५) २५गुण सूट न मिळाल्या विषया समोर लिहावेत.

रकाना ९: मध्ये किती गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली (उदा.८०) तर त्या नुसार पास विषयांच्या गुणांची बेरीज करून ती शेवट खाली लिहावी त्या मध्ये पर्यावरण विषयाचे गुण धरु नयेत
(उदा. ४ विषयात पास असेल तर ८०×४=३२०)

रकाना १०: मध्ये पास विषयांच्या प्राप्त गुणांची बेरीज करून शेवटी खाली लिहावी.
(उदा.४५+५०+५६+६५=२१६)
म्हणून ३२०=२१६ तर १००=?
(२१६×१००÷३२०=६७.५=६८)

जर १०० पैकी ६८ तर त्याचा  ४०%=?
(६८×४०÷१००=२७.२=२८

समजा इंग्रजी विषयात तोंडी परीक्षेत १८ गुण असतील तर
इंग्रजी विषयाचे अंतिम गुण-
२५+२८+१८=७१

अर्थशास्त्र विषयात अंतर्गत मूल्यमापन २० पैकी २० गुण आहेत
तर अर्थशास्त्र विषयाचे अंतिम गुण-
२५+२८+२०=७३
याप्रमाणे मुल्यमापन होईल.