पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल-
राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख पुन्हा बदलली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्टला आयोजित केली होती.
8 ऑगस्ट ला राज्यात केंद्रीय पोलीस बलाची परीक्षा होत असल्याने परीक्षा पुढे ढकलली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा अगोदरच लांबणीवर टाकली होती.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. ०९/०८/२०२१ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत जाहीर करण्यात आले होते.
तद्नंतर राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरपरिस्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करता सदर परीक्षा दि. ०९/०८/२०२१ ऐवजी १२/०८/२०२१ रोजी घेण्यात येईल असे राज्य परीक्षा परिषदेने
जाहीर केले आहे.
यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. १२/०८/२०२१ च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल.
Link of scholarship exam portal:
परीक्षा दि.
१२-०८-२०२१
-----------------------------------------------------------
परिपत्रक
👇
Social Plugin