मतदार नोंदणी अभियान
दि.०९ ऑगस्ट २०२१ पासुन ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत
नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू झाला आहे.
तरी १ जानेवारी २०२२ पर्यंत वय वर्ष १८ पूर्ण होणाऱ्या नवीन मतदारांनी खालील कागदपत्रांसह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे संपर्क साधावा.
नवीन मतदार नोंदणीसाठी कागदपत्रे:-
१) जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला किंवा
२) बोनाफाईड सर्टिफिकेट
३) रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला (स्वतःच्या सहीचा)
४) आधारकार्ड झेरॉक्स
५) २ पासपोर्ट साईज
फोटो
६) घरातील नात्यातील (आई, वडील, भाऊ, बहीण)
यापैकी एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ट असेल तर त्यांच्या मतदान
ओळखपत्राची झेरॉक्स
घरातील सुनबाईचे नाव समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रे:-
१) जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट २) रहिवासी बाबत
स्वयंघोषणा दाखला
३) स्वतःच्या सहिचा
४) २ पासपोर्ट साईज फोटो
५) माहेरच्या गावात
मतदार यादीत नाव असेल तर ते
नाव कमी केल्याचा दाखला
किंवा
५) माहेरच्या गावात मतदार यादीत नाव नसेल तर यादीत नाव नसल्याचा
दाखला
६) पतीचे मतदार
ओळखपत्र झेरॉक्स
७) लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखला
टिप: १ जानेवारी २०२२ ला आपले वय वर्ष १८ वर्ष पाहिजे
असे सर्व स्त्री व पुरुष मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र.
Last Date: 30 September 2021
Website for more information:
https://ceo.maharashtra.gov.in
---------------------------------------------------------------------------
Social Plugin