राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती - तज्ज्ञ निवड
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसित करतानाच २५ पोझिशन पेपर तयार करण्यात येणार आहेत.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मितीची प्रक्रिया सर्वसमावेशक व राज्यातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या समवेत तयार करण्यात येणार आहे.
१. राज्य अभ्यासक्रम आराखडा-शालेय शिक्षण
२. राज्य अभ्यासक्रम आराखडा- बालपणातील काळजी व शिक्षण
3. राज्य अभ्यासक्रम आराखडा- शिक्षक शिक्षण
४. राज्य अभ्यासक्रम आराखडा - प्रौढ शिक्षण
उपरोक्त नमूद प्रमाणे चार राज्य अभ्यासक्रम आराखडे व २५ पोझिशन पेपर विकसित करण्यासठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मधील प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, अध्यापक विद्यालयातील प्राचार्य व अध्यापकाचार्य, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, विषय तज्ज्ञ, विशेष तज्ज्ञ, केंद्रप्रमुख, प्राथमिक / माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक तसेच विद्यापीठातील प्राध्यापक, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शासनाच्या विविध विभागातील अधिकारी, अशासकीय संस्थांचे सदस्य या मधील इच्छुक तज्ज्ञांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
तरी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा, पोझिशन पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेऊन योगदान देण्याची इच्छा व आवश्यक तज्ज्ञत्व असणाऱ्यांनी
या वेबसाईटवर आवेदन करावे. सदर आवेदन पत्र भरण्याची अंतिम तारीख १७.०९.२०२१ आहे.
अर्ज केलेल्या तज्ज्ञांमधून विहित पद्धतीने आवश्यक तज्ज्ञांची निवडप्रक्रिया सदर कार्यालयामार्फत पार पाडण्यात येईल व निवड झालेल्या संबंधिताना इमेल/पत्राद्वारे पुढील प्रक्रियेबाबत सूचित करण्यात येईल.
तरी याबाबत आपल्या अधिनस्त असणा-या कार्यक्षेत्रातील इच्छुक तज्ज्ञ व्यक्तींना उपरोक्त वेबसाईटवर अचूक माहिती भरण्याबाबत अवगत करण्यात यावे.
एम.डी.सिंह
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
Letter of SCERT
Social Plugin