e-RUPI डिजिटल पेमेंट सोल्यूशन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी e-RUPI हे डिजिटल पेमेंट सोल्यूशन सोमवारी (2 ऑगस्ट 2021) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लाँच
केलं. e-RUPI हे एक प्रीपेड इलेक्ट्रॉनिक व्हाउचर (Prepaid Electronic Voucher) आहे.
वैशिष्ठे:
1) e-RUPI युजरला एसएमएस किंवा क्यूआर कोडच्या रूपात
मिळेल.
2) हे व्हाउचर क्रेडिट किंवा डेबिट कार्डशिवाय, तसंच इंटरनेट बँकिंगशिवाय रिडीम करता येऊ शकतं.
3) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCI ने e-RUPI विकसित केलं आहे.
4) या माध्यमातून कॅशलेस (Cashless) आणि काँटॅक्टलेस पेमेंट (Contactless Payment) करता येणं शक्य आहे.
NPCI, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय आणि नॅशनल
हेल्थ ऑथोरिटी या सर्वांनी मिळून e-RUPI हे माध्यम सादर केलं आहे.
e-RUPI हे नेमकं काय आहे?
e-RUPI हे क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंगवर
आधारित ई-व्हाउचर आहे. ते लाभार्थ्यापर्यंत मोबाईलच्या माध्यमातून पोहोचवता येऊ
शकतं. हे वन टाइम पेमेंट मेकॅनिझम (One Time Payment Mechanism) असून, डिजिटल
पेमेंट अॅप किंवा इंटरनेट बँकिंग अॅक्सेसशिवाय हे व्हाउचर रिडीम करता येऊ शकतं.
या माध्यमातून कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट होईल.
e-RUPI डिजिटल व्हाउचरचा उपयोग कुठे होईल?
याचा उपयोग आयुष्मान भारत जनआरोग्य योजना, तसंच वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांतर्गत सेवा
देण्यासाठी केला जाऊ शकतो. खासगी क्षेत्रातही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठीच्या
कल्याणकारी योजना, तसंच सीएसआर कार्यक्रमात या डिजिटल
व्हाउचर्सचा उपयोग करू शकतात.
या प्लॅटफॉर्मचे फायदे काय?
डिजिटल पेमेंटमुळे देशातल्या भ्रष्टाचारावर अंकुश लागला आहे. ई-रुपी
ही नवी यंत्रणाही अशी आहे,
की जिच्या माध्यमातून पारदर्शक आणि
सोप्या पद्धतीने देवाणघेवाण शक्य आहे. तसंच, लाभार्थ्यांना
कोणत्याही त्रासाशिवाय योजनांचा थेट लाभ मिळणार आहे.
या प्लॅटफॉर्मचा वापर नेमका कसा करायचा?
e-RUPI चा वापर करणं सोपं आहे. समजा तुम्हाला एखाद्या हॉस्पिटलचं पेमेंट
करायचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे व्हाउचर असेल. ते व्हाउचर सरकारी संस्था किंवा
कोणतीही व्यक्ती पाठवू शकते. यासाठी तुम्हाला सर्वांत आधी ई-रुपी अॅप ओपन करून
व्हाउचर काढावं लागेल. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ई-रुपी व्हाउचर दाखवावं
लागेल. त्यानंतर तुमचं व्हाउचर क्यूआर कोडमध्ये रूपांतरित होईल. तहॉस्पिटलचे
कर्मचारी क्यूआर कोड स्कॅन करतील. त्यानंतर तुम्हाला मोबाईलवर एक व्हेरिफिकेशन कोड
येईल. तो कोड सांगितल्यावर तुमचं व्हाउचर रिडीम होतं.
व्हाउचर जनरेट कसं होतं?
1) ही यंत्रणा एनसीपीआयने यूपीआय प्लॅटफॉर्मवर (UPI) तयार केली आहे.
2) सर्व बँका ही व्हाउचर्स जारी करू शकतील. लाभार्थ्याची ओळख मोबाईल
नंबरच्या माध्यमातून होईल.
3) सर्व्हिस प्रोव्हायडरला व्हाउचर जनरेट करण्यासाठी बँकेशी संपर्क
साधावा लागेल.
4) बँक सेवा पुरवठादाराला व्हाउचर अलॉट करेल. त्यानंतर व्हाउचर
लाभार्थ्याला जारी केलं जाईल.
5) ज्यासाठी हे व्हाउचर तयार करण्यात आलं आहे, केवळ त्याच कामासाठी लाभार्थी हे व्हाउचर वापरू
शकतो.
खालील बँका या सुविधा देतील:
भारतीय
स्टेट बँक (SBI),
आयसीआयसीआय
बँक (ICICI),
एचडीएफसी
बँक (HDFC),
पंजाब
नॅशनल बँक (PNB),
अॅक्सिस
बँक (Axis),
बँक
ऑफ बडोदा (Bank of
Baroda)
e-RUPI कुपन जारी आणि रिडीम करणं अशा दोन्ही
सुविधा देतील.
e-RUPI कुपन देणाऱ्या बँका:
कॅनरा बँक, इंडसइंड बँक, इंडियन बँक, कोटक
महिंद्रा बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या बँका सध्या e-RUPI कुपन केवळ जारी करू शकतील.
Social Plugin